corona-viris-akl_202003383651.jpg 
अकोला

अकोल्यात ठराविक तारखांना झाला कोरोनाचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः विदर्भातील कोरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणून अकोला शहराकडे पाहिले जाते. अवघ्या साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरात नागपूरहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ७94 झाली आहे. ही वाटचाल हजाराच्या दिशेने असून, पुढील काही दिवसांत हजारापर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी अकोल्यात काही ठराविक तारखाना अकोलेकरांना अचंबित करणारे रुग्ण आढळले असून, त्या सात तारखा म्हणजे अनेकांची झोप उडविणाऱ्या अशाच आहेत.

जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. एपिलअखेरपर्यंत 28 रुग्ण आढळले होते. या काळात एकाच दिवशी आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांचा आकडा 7 होता. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासून बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत गेली अन् कोरोनाची साखळी वाढत गेली. मे महिन्यात एकाच दिवशी 27 मे रोजी सर्वाधिक 72 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर महिनाभर दररोज सरासरी 10 ते 12 च्या वर रुग्ण आढळत गेले. त्यानंतर जून महिन्याच्या अवघ्या सातच दिवसांत तब्बल 214 कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्याने अकोलेकरांकडून वाढत्या आकड्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

डबलिंग दर चिंताजनक
सध्या अकोल्यात ७94 पाॅझिटिव अहवाल आले आहेत. यातील पहिले 355 रुग्ण हे 46 दिवसांत आढळले होते. तर पुढील 371 रुग्ण अवघ्या 14 दिवसात समोर आले आहेत. त्यामुळे अल्पावधीत बाधितांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसत आहे.

या आहेत त्या भडका उडविणाऱ्या तारखा
तारीख            रुग्णसंख्या
27 मे                   72
4 जून                   46
8 मे                       42
29 मे                    42
3 जून                   40
17 मे                    37
21 मे                      33
7 जून                     38

महिन्यानुसार आढळलेले रुग्ण
एप्रिल - 28 रुग्ण
मे - 553 रुग्ण
जून- 214 रुग्ण (7 दिवसांत) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT